केंद्राकडून थाळी आणि टाळी शिवाय मदत नाही; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

केंद्राकडून थाळी आणि टाळी शिवाय मदत नाही; वडेट्टीवारांचा हल्लाबोल


आज घडीला या देशावर ९३ लाख कोर्टीचे कर्ज आहे. देश पूर्णत: कर्जाच्या दरीत लोटला जात आहे. २०१४ पर्यंत ४६ लाख कोटी कर्ज होते. मार्च २०२० मध्ये कर्ज ९३ लाख कोटीच्या घरात गेले आहे. करोनामुळे अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहे. त्याचा परिणाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार टाळी आणि थाळी शिवाय काही देऊ शकले नाही, असं म्हणत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.