कोरोना आणि जागितिकीकरणाची दिशा -3

भारतीय चीनी वस्तूवर बहिष्कार घालतील यात शंका नाही.त्यामुळेच आतापासून चीन चीनीभाई भाई चा प्रचार आळवीत आहे.त्यासाठी त्यांनी तो आपल्या __राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनला आहे ,कोरोनाच्या निर्मीत्ताने दैववादावरही बरेचसे प्रबोधन होत आहे.देव हा संकटात धावून येतो ___ असे आजपर्यत म्हटल्या जात होते कोरोनात मात्र सर्व देवांनी सक्तीने कारंटाईन स्विकारले आहे.सामना सारख्या दैनीकातून पहिल्यांदाच दैववादावर टिका करणारा लेख संजय राऊतांनी लिहला.त्यावर सर्व स्तरातून व्यापक चर्चा झाली. देवांनी मैदान सोडले त्यामुळे आता दैववादावर अवलंबून आपले हित होणार नाही असा सुर त्यात होता.तो प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा परीपाक होता. देव देवळात नसतो देवळात पुजाऱ्यांचे पोट असते असे गाडगे बाबा म्हणाले होते. त्यामुळे लाखो समाजसुधारकांनी जे सांगीतले त्याची प्रचिती कोरोनामुळे लाखो दैववादी लोकांना झाली,आता तरी भारतीय लोक दैववादापासून काहीसे दुरावतील अशी आशा आहे.त्यापुढे जाऊन पुतळ्यांवर आणि मंदीरावर लाखो रुपये खर्च करणारे आपले प्रधानसे वक नागरीकत्व ,हिंदू देश उभारणीचे भाबडे स्वप्न दाखवून देशासाठी काहीही केलेले नाही हेही उघड झाले आहे. केवळ ईटलीच्या आरोग्य व्यवस्थेचे डोस पाजवून घरातच बसा असा एकतर्फी कार्यक्रम आळवीला जात असताना भारतात मात्र आपण गेल्या ७ वर्षात एकही रुग्णालय उभारु शकलो नाही,आरोग्यावर काहीएक रक्कम खर्च झाली नाही,पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही,केवळ राम आणि मंदीरे ,हिंदू मुस्लीम वाद,विरोधी लोकांना दहशतवादी,नक्षलवादी असे शिक्के मारुन काँग्रेसने देश लू बाड ल्याच्या वल्गना करण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही याची साधी खंतही व्यक्त मोदींनी व्यक्त के ली नाही. देशप्रेमाचा मुलामा माज यावेळी दिसला नाही.कुठे गेली आता स्वंयसेवकांची फौज,लाठ्या _ काठ्यांची आयुधे,रेशीमबागेतील देशसेवक सगळे दिखाऊ आणि घरभेदी हे आता उघड झाले आहे. लाखोंची मदत सगळे उद्योजक,खेळाडू देत आहेत.या पैशाचा सरकार विनियोग करणार का? पुन्हा आपला पाढा सुरुच हा प्रश्न यानिर्मीत्ताने निर्माण झाला आहे.प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते त्यातून आपण काय धडा घ्यायचा हे ठरवले पाहिजे,केवळ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करुन उपयोग नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षण ,आरोग्य यावर लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी भबकेबाज प्रचार सोडून धार्मिक सहीष्णू दृष्टी स्वीकारावी लागेल,तेव्हाच कुठे रचनात्मक बदल दिसू लागतील,याबरोबरच गोमुजामुळे सगळेच आजार दूर होतात असा स्वदेशी शोध लावणाऱ्यांना आळा घालावा लागेल,कुठे गेले आता बाबा रामदेव त्यांनी किती रक्कम मदत म्हणून दिली सरकारला.रामदेवांचे कुठे गेले स्वदेशप्रेम, कुठे गेली पतंजली उपचारपध्दती,काहीही करुन अध्यात्माद्वारे लोकांना धार्मिक नशेत चढवून आपले हित साधण्याची ती एक पध्दत आहे. त्यामुळे कोरोनाने जग ण्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून धार्मिक सहिष्णू ते तूनच अंतीम जगाचे कल्याण आहे हे दाखवून दिले आहे हे मात्र नक्की. हर्षवर्धन पाटे, ____नांदेड