मुंबईत दिवसागणिक वाढणारे कोरोनाबाधित आणि | कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरबाबत सरकारची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन असुनही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तर कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू दर कमी कसा करता, येईल यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ती म्हणजे, सरकारने याबाबत उच्चस्तरीय समिती नेली आहे. राज्यात मृत्यूदर अपेक्षा पेक्षा जास्त होताना दिसत आहे. मृत्यूदर कमी कसा करता यासाठी ही समिती काम करणार आहे. डॉक्टरांची हाय पॉचर समिती केंद्र सरकारच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलपेक्षा आणखी काही जास्त केले पाहिजे का, याबाबत ही उच्चस्तरीय समिती अभ्यास करेल. त्याचप्रमाणे मृतांटो मधुह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार असलेले रुग्ण | जास्त आहेत. त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या कॉर्बिडीटी म्हणजे पूर्वीचा आजार हे प्रमुख कारण समोर आले | आहे. याबाबतही समिती अभ्यास करुन लवकरच आपला अहवाल सादर करेल. दुसरीकडे, मुंबईतील जेजे, केईएम यासारख्या रुग्णालयातील लोकांच्या मदतीने सरकारला सल्ला देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मृतांचा आकडा कसा कमी करता येऊ शकेल, याबाबत सरकारला सल्ला आणि सूचना देईल. मुंबईत कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढला आहे. राज्यात सोचारी ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८२७ नवे रुग्ण आढळले. एवढेच नाही तर १५० संशयीत रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दिलासादायक म्हणजे पूर्णपणे बरे झालेल्या ५५ रुणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५00 च्यावर पोहोचली आहे तर एकट्या मुंबईत कोरोनामुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोचिडची साथ अद्याप दुसन्या टप्प्यात आहे. म्हणजेच साथ कम्युनिटी स्प्रेड च्या स्वरूपात पसरलेली नाही. पण अ.भा.वैद्यकीय संस्थेच्या संचालकांनी मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. या संस्थेचे जबाबदार संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितले की- कोरीनाची साथ काही भागांध्यो तिसन्या टप्प्यात पोहोचली आहे. आता ज्या भागात हा टप्पा गाठला आहे, तियेच ती आटोक्यात ठेचली नाही, तर संपूर्ण शहरभर हा पहायरस झपाट्याने पसरेल आणि मग आता न्यूयॉर्क किंवा सुरुवातीला चुहानची झाली, तशी आपली स्थिती होवून जाईल. धक्कादायक म्हणजे गुलेरिया यांनी मुंबईचे नाव प्राधान्याने घेतल्यामुळे आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीचे टेन्शन वाढले आहे. महामारीचे संकट दिसत असतानाही मुंबई-पुण्यातले नागरिक अजूनही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम | काटेकोरणे पाळत नाहीत. हे चित्र पाहता त्यांना या साथीचे गांभीर्य लक्षात येत नसल्याचे खेदाने म्हणावे लागेल. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये सध्या ही स्थिती आली आहे. एका दिवसात अमेरिकेत पंधराशे जणांचा बळी गेला. कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिकेत लाखाचर पोहोचली आहे. ती स्थिती टाळायची असेल तर आत्ताच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरात राहायला हवे. पुण्यात एका दिवसात ४१ कोरीनारुग्णांची भर पडली. मुंबईत दिवसभरात ६८ रुग्ण वाढले. मुंबईत २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ कोरोनाग्रस्तांचे प्रमाण गुणाकार पद्धतीने वाढायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह पुण्यात त्याचा विळखा वाढत आहे. या भागातला फैलाच शहरभर पसरू नये म्हणून लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पूर्णकरांनाही आठवड्यातून एकदाच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे. यावरून पुण्याचा संभाच्या धोका लक्षात येईल. कारण कोरोनाहायरसने आता लोकलाइज्ड कम्युनिटी स्प्रेडच स्वरून दाखवायला सुरुवात केली आहे. | तज्ज्ञांच्या मते, हा लोकलाइज्ड कम्यूनिटी स्प्रेड आहे तिथेच रोखला आणि तो आणखी इतर परिसरां टो पसरू दिला नाही,तर भारत बराच काळ दुसन्या टप्प्यात | राह शकतो आणि कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ शकते. कोरोनाहायरसचा फैलाच ज्या वेगाने होतो,त्या वेगानुसार ही साथ कुठल्या टप्प्यात आहे हे ओळखता येते आणि त्यानुसार उपाययोजना करता येतात. भारतात आता हळूहळू चाचणीचे प्रमाण वाढत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव गुणाकार पद्धतीने वाढतो. त्याला डबलिंग इफेक्ट म्हणतात. अत्यल्प काळात रुतणांची संख्या दुपटीने वाढते. हा डबलिंग इफेक्ट वाढला की तिसरा टप्पा जवळ आला असे समजले जाते. मुंबईतही काही भागात हा संसर्ग कम्युनिटी स्प्रेड टप्प्यात आलेला दिसतो. त्यामुळे आता चिंता वाढली आहे. घरात बसणे आणि शक्य तेवढा बाहेरचा संपर्क टाळणे हाच यावरचा प्रभावी उपाय आहे.
संपर्क टाळणे हाच प्रभावी उपाय